चतुर चौकस - लेख सूची

निवडणुका आणि प्रातिनिधीक लोकशाही

नुकतेच हाती आलेले लोकसभा निवडणुकांचे निकाल आणि तदनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी या अनुषंगाने ही मांडणी. ‘निवडणुकांमध्ये यशस्वी झालेले उमेदवार हे खऱ्या अर्थाने लोकांचे प्रतिनिधी असतात का?’ हा कुठल्याही लोकशाहीतला मूलभूत प्रश्न. त्याला वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या पद्धतीने उत्तरे शोधली गेली. भारतात आपण ‘सगळ्यांत पुढे तो जिंकला’ (फर्स्ट पास्ट द पोस्ट) हे उत्तर स्वीकारले. या पद्धतीचा एक …